G3ict चे सगळ्यांसाठी स्मार्ट शहरे टूलकिट

जगभरातील स्मार्ट शहरांना मदत करण्यासाठी ह्या टूलकिटमध्ये चार टूल्स आहेत, ज्यात आयसीटीच्या सुलभतेवर लक्ष केंद्रीत केले आहे, आणि दिव्यांग असलेल्या लोकांचा तसेच वृद्धांचा डिजीटलमध्ये अंतर्भाव करणे, हे ही आहे.

ह्या टूलकिटद्वारे भरपूर संस्थांना आणि स्मार्ट शहरांशी निगडीत ज्यात सरकारी व्यवस्थापक, धोरण तयार करणारे, आयटी व्यावसायिक, दिव्यांगचे अधिवक्ते, खरेदी अधिकारी, तंत्रज्ञान पुरवठादार आणि स्मार्ट शहरांचे अॅप्स विकसित करणारे आणि तोडगे काढणारे येतात, त्या भूमिकांना समर्थन दिले जाते,

ह्यातील प्रत्येक टूल स्मार्ट शहरातील दिव्यांग असलेल्या लोकांचा तसेच वृद्धांचा डिजीटलमध्ये अंतर्भाव करण्यासाठी, जागतिक तज्ञांनी शोधलेल्या, प्राधान्य आव्हानाला संबोधित करते.

ह्या छोट्याशा दस्तावेजात चारी टूल्सपैकी प्रत्येकाची थोडक्यात माहिती, डाऊनलोड करण्यासाठी खाली दिली आहे.

मराठीत PDF fileOpens in a new window

ह्या समावेशित नविन उपक्रमांच्या दिशानिर्देशांचे उद्देश्य, शहरांना, त्यांच्या भागीदारांना आणि भागधारकांना तंत्रज्ञानातील नविन उपक्रम प्रक्रियेचा भाग म्हणुन समावेशाची नविन व्याख्या बनविण्यात मदत करणे आणि त्यांचा अंतर्भाव शहरी नव उपक्रमातील एकोसिस्टम (उदा. इनक्युबेटर्स, अॅक्सलेरेटर्स, निवेशक वगैरे) मध्ये करणे हा आहे. अन्य संस्थांना जर नविन उपक्रम आणि समावेश अशा दोन्हीत (उदा. विश्र्वविद्यालये, आर्थिक विकास क्षेत्र, राष्ट्रीय शासन, वगैरे) स्वारस्य असेल तर त्यांनाही ह्या दिशानिर्देशातुन लाभ मिळेल.

स्मार्ट शहरांसाठी समावेशित नविन उपक्रम दिशानिर्देश आत्ताच डाऊनलोड करा: फक्त इंग्रजीत – सध्यातरी हे टूल फक्त इंग्रजीतच उपलब्ध आहे.

माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचे (आयसीटी) सुलभता मानक हे स्मार्ट शहरांसाठी जास्त सम्मिलीत दृष्टीकोन तयार करण्यासाठी प्रमुख आहेत. ह्या मार्गदर्शनात आयसीटीची व्याख्या करणार्‍या तीन मुख्य मानकांचे सुलभता निकष पुरविले आहेत आणि नेते वापरु शकतील अशा प्रभावी कार्यांची पायरीनुसार सूचीही दिलेली आहे, जी वापरुन ते त्यांच्या शहरात ह्या मानकांची ओळख होईल आणि त्याचा वापर प्रभावीपणे केला जाईल ज्यामुळे त्यांच्या शहरातील आयसीटीची सुलभता वाढेल, ह्याची खात्री करु शकतील.

अग्रक्रमी आयसीटीच्या सुलभता मानकांच्या अंमलबजावणीचे मार्गदर्शन डाऊनलोड करा:
मराठीत PDF fileOpens in a new window

जगभरातील स्मार्ट शहरे ही त्यांच्या लक्षणीय क्रयशक्तीच्या दृष्टीने, ज्यात आयसीटीचाही समावेश आहे, त्याचे अधिकार उन्नत करण्यासाठी आणि दिव्यांग असणार्‍यांना आणि वृद्धांना डिजीटलमध्ये सामवेशित करण्यासाठी, अद्वितीय स्थितीत आहेत. दिव्यांग असणार्‍यांना आणि वृद्धांना आयसीटी खरेदी सुलभता पुरविण्याच्या धोरणाचा अवलंब करण्यासाठी, शहरांना ह्या मार्गदर्शनामुळे मदत मिळेल. ह्या मार्गदर्शनात आदर्श पुरवठा धोरण आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी पायर्‍यांप्रमाणे सूचि दर्शविली आहे.

आयसीटी सुलभता पुरवठा धोरण अवलंबनाचे मार्गदर्शन डाऊनलोड करा:
मराठीत PDF fileOpens in a new window

जास्त समावेशित स्मार्ट शहरे बनविण्यासाठी असणारी सगळ्यात मोठी समस्या आहे, दिव्यांगची जागरूकता निर्माण करणे आणि आयसीटीची सुलभता पुरविणे. ह्या टूलच्या डिझाइनमुळे शहराच्या डिजीटल सेवांमध्ये आयसीटीची सुलभता समावेशित करण्याचे फायदे प्रभावीपणे सांगीतले जातील. दिव्यांग असणार्‍या व्यक्तींचा डिजीटलमध्ये समावेश करण्यासाठी, व्यवसाय, मानवी अधिकार आणि मजबूत बांधिलकीचे तांत्रिक तर्क हे टूल पुरविते. स्मार्ट शहर हे सुलभ शहर असले पाहिजे ही कल्पना विविध भागधारकांना संप्रेषित करण्यासाठीसुद्धा हे वापरले जाऊ शकते.

शहरात डिजीटल समावेशाची मजबूत बांधिलकी प्रकरण संप्रेषित करण्यासाठी डाऊनलोड करा:
मराठीत PDF fileOpens in a new window

जी स्मार्ट शहरे आयसीटीच्या सुलभतेचा समावेश त्यांच्या कार्यक्रमात आणि उपायात करतात, ती शारीरिक कमजोर आणि वृद्ध नागरीकांना आणि एकुणच जनतेला भरपूर फायदा पोचवितात. ह्या टूलचे डिझाईन असे तयार केले गेले आहे कि ते सध्याचे उत्पाद आणि उपाय जे वापरुन स्मार्ट शहरे, स्वतंत्र रहाणी, सार्वजनिक सुरक्षा, परिवहन, रोजगारासारख्या गंभीर क्षेत्रातील नागरीकांवर आणि ऑनलाईन सार्वजनिक सेवेवर सकारात्मक परिणाम करु शकतील. डाटाबेसची सुरवात अल्फा आवृत्तीने होत आहे, ज्यात संकल्पनेचे पुरावे, चाचणीसाठी रोडमॅप, 350हूनही अधिक उदाहरणे सध्या ह्या डाटाबेसमध्ये आहेत आणि आम्ही बीटा आवृत्तीकडे जात असताना ह्या डाटाबेसची सतत वाढ होत आहे ती सांभाळणे, केले जात आहे.

शहरांमध्ये डिजीटल समावेशाच्या उपायांचा डाटाबेस (अल्फा आवृत्ती) डाऊनलोड करा:
मराठीत PDF fileOpens in a new window